होय मी वंचित म्हणत विनाअट शिक्षक पती पत्नी आंतरजिल्हा बदलीसाठी शेकडो भगिनींची शरद पवार, मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री, रोहित पवारांना राखी

264

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

महाराष्ट्र राज्य शिक्षक पतीपत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीच्या वतीने मा.शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना भाऊ मानत शेकडो शिक्षिका भगिनींनी राज्यभरातून राख्या पाठवल्या आहेत.
महाराष्ट्रात मागील १६ ते १७ वर्षापासून शिक्षक पती पत्नी आपल्या कुटुंबापासून २०० ते ८०० किमी दूर राहून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. असंख्य शिक्षक पती पत्नींचे संसार मोडकळीस आलेले आहेत.त्यांच्या लहान मुलांना आई वडिलांच्या प्रेमापासूनच वंचित राहावे लागत आहे.इतरांच्या मुलांना शिक्षण आणि संस्कार देणारे शिक्षक पती पत्नी मात्र स्वतःच्या मुलांना शिक्षण आणि संस्कार देण्यापासून वंचित आहेत. कुटुंब विस्कळीत झालेली असल्याने मुलांवर शारीरिक आणि मानसिक आघात झालेला आहे. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे.शिक्षक पती पत्नी देखील प्रचंड मानसिक तणावाखाली जगत आहेत. महिला शिक्षिकांना कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळेशारीरिक व मानसिक छळवणूकीला सुद्धा सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून कुटुंब विस्कळीत झालेली असल्याने वृद्ध आई वडील, सासु सासरे, लहान मुले यांच्या चिंतेने शिक्षक पती पत्नींचे मानसिक संतुलन बिघडत आहे.त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर त्यांचा नक्कीच परिणाम होत आहे.अनेक वेळा शासन दरबारी विनंती तसेच अर्ज करूनही जागा नसल्याचे कारण दाखवत शासन शिक्षक पती पत्नींच्या आंतरजिल्हा बदल्या करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेकडो भगिनींनी राखीच्या माध्यमातून शरद पवार,मुख्यमंत्री,ग्रामविकासमंत्री
तसेच रोहित पवार यांना भाऊ मानत राखीची ओवाळणी म्हणून शिक्षक पती पत्नी आंतरजिल्हा बदली विनाअट विनाविलंब करण्याची मागणी केली आहे. वरील नेत्यांना रक्षाबंधन निमित्त मनीषा कड, पल्लवी मांडोळे, सोनाली माडेकर, हर्षाली डुंबरे, साधना लवटे, पूजा पाटील, सुनीता माने, अनिता कापसे, वर्षा राठोड, अनुराधा लहाने, अर्चना राजुरवार, सपना हिरे, शोभा सिरसाठ, भारती कोल्हे मनीषा दाते, हर्षा बुटे, अनिता जाधव,, शिला श्रीखंडे, माधुरी मनगिरे, रुपाली वाघ, भारती चौधरी, अंबिका कदम, सीमा काळे, मनीषा अडसुरे, मीना गुंजकर, सुलोचना चव्हाण, सोनाली कुलकर्णी,शीतल वाघमारे, रंजना खाडे, सुनीता पोले, सुरेखा जासूद, शिवबाई पाटील, ललिता बानगुडे, अर्चना परीहार यांच्या सह शेकडो महीला शिक्षकांनी राख्या पाठविल्या.

प्रतिक्रिया…
महाराष्ट्र शासनाचे जिल्हा अंतर्गत मध्ये पतीपत्नी एकत्रीकरण धोरण असून ३० किमी पेक्षा दूर पतीपत्नी यांना पदस्थापना देता येत नाही. तर आंतरजिल्हा बदली मध्ये असे कुठल्याच प्रकारची धोरण नाही. आमच्या दोघांचे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून पतीपत्नी एकत्रीकरण केले जात नाही.आमच्या कौटुंबिक स्वास्थ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्र्यांसह, शरद पवार, हसन मुश्रीफ,रोहित पवार यांना राखी पाठविली असून पतीपत्नी एकत्रीकरण करावे अशी विनंती केली आहे.

भारती कोल्हे अकोट.