बजरंग दल साकोलीने राबविला अनोखा उपक्रम

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली- येथील बजरंग दल शहर अध्यक्ष पुष्कर करंजेकर यांच्या (१ ऑगस्ट)वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयातील प्रसुती झालेल्या नवजात बालकांना डासांपासून होत असलेल्या रोग थांबविण्यासाठी मच्छरदाणीचे वाटप करुन आपला वाढदिवस साजरा केला.व दरवर्षी हा अनोखा उपक्रम राबविण्याचा संकल्प बजरंग दल साकोलीने घेतला.या उपक्रमाची शहर वासी यांनी प्रशंसा केली असुन, आरोग्य कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमात नगरसेवक मनिष कापगते, माजी न.प.उपाध्यक्ष तरुण मलानी यांनी मच्छरदाणीचे वाटप केले.सोबत भाजपा जिल्हा सचिव राधेश्याम मुंगमोडे,प्रहार तालुका अध्यक्ष किशोर बावने, विहिंपचे राधेश्याम आगाशे, भाजपचे शरद कापगते , भाजपा महिला आघाडीचे गीता कापगते,छाया ब्राम्हणकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिपक हिवरे, नितीन खेडीकर व बजरंग दल, विहिंप, भाजपा तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.या उपक्रमाची वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रशेखर मेश्राम व कर्मचाऱ्यांनी खूप प्रशंसा केली.