Home अकोला अकोला जिल्हात बार्टी समतादूत यांचे मार्फत अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त ऑनलाइन प्रबोधन...

अकोला जिल्हात बार्टी समतादूत यांचे मार्फत अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रम

146

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे अंतर्गत मा.धनंजय मुंडे मंत्री,सामाजिक न्याय व विशेष सहा.विभाग,मा.विश्वजित कदम,राज्यमंत्री(सा.न्या.व.वि.स. वि),मा.पराग जैन – नैनुटीया (भाप्रसे) प्रधान सचिव(सा.न्या. व.वि.स.वि),मा.कैलास कणसे महासंचालक बार्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती प्रज्ञा वाघमारे मुख्य प्रकल्प संचालक समतादूत प्रकल्प यांच्या संकल्पनेतून समतादूत प्रकल्पाच्या संयोजनात लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अनुसूचित जातीतील तळागाळातील वंचित घटकाच्या सामाजिक,आर्थिक व मानसिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या व बार्टीच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवणे व त्यांना त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल यासाठी जनजागृती करणे.यासोबत या ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत प्रसिद्ध वक्ते,प्रबोधनकार,विचारवंत,कवी,साहित्यिक,अधिकारी वर्ग यांचा सहभाग करून त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक,प्रबोधनात्मक जनजागृतीपर व्याख्याने,चर्चासत्रे आयोजित करणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून हे कार्यक्रम समतादूत आपल्या तालुका कार्यक्षेत्रात आयोजित करत आहे.समतादूत मनुष्यबळामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व राज्यघटनेतील नमूद समता न्याय बंधुता हे मूलभूत तत्व जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी समाजात सामाजिक सलोखा बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी कार्य केले जाते.
कोरोना प्रादुर्भाव लॉकडाऊन काळात समतादूत यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणू प्रादुर्भाव जनजागृती केली विविध ठिकाणी स्थानिक सामाजिक संघटना यांच्या सोबत स्वयंस्फूर्तीने मदतकार्य करत आपले योगदान दिले.त्यामध्ये सर्वांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे याबाबत जनजागृती केली.कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने बार्टी मार्फत एम.पी.एस.सी.ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग सुरू केले आहेत.बार्टीच्या या अभिनव उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा यासाठी समतादूतांमार्फत या उपक्रमाचा सोशल मीडिया च्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष प्रचार प्रसार करण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.यासोबत समतादूत यांचे मार्फत जिल्हातील गावपातळीवर अनुसूचित जातीतील कुटुंब व सदस्य किती हे माहिती संकलन सुरु आहे.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी महोत्सव आपण यावर्षी साजरा करत आहो.त्यामध्ये समतादूत यांचेमार्फत जिल्हातील आपल्या तालुका कार्यक्षेत्रात ऑनलाइन प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये समतादूत हे आपल्या तालुक्यातील विद्यार्थी तसेच इतर लाभार्थ्यांना सहभाही करून विविध मार्गदर्शक प्रबोधन कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात आयोजित करत आहेत.यादरम्यान दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी जिल्हास्तरीय ऑनलाइन अभिवादन व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम दोन सत्रात संपन्न झाला असून पहिल्या अभिवादन सत्रात कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बुलढाणा येथील मुक्त पत्रकार जेष्ठ साहित्यीक कवी नरेंद्र लांजेवार हे लाभले होते तर प्रमुख वक्ते म्हणून रवींद्र मालखेडे हे लाभले होते.तर दुपारच्या सत्रात व्याख्याते म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध सप्तखंजेरीवादक प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी व अध्यक्ष म्हणून नवनियुक्त तहसीलदार शुभम बहाकार हे लाभले होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत रविना सोनकुसरे,प्रज्ञा खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन समतादूत समता तायडे,वैशाली गवई यांनी केले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून बार्टी मुख्यालयाकडून सैयद दिलावर,चरणगाव तालुका पातूर चे सरपंच सरकटे,शिक्षक अभय वानखडे,प्रभाकर सोनकुसरे,राजकन्या आडोळे मुंबई,सौ.कविता सिरसाट यांची लाभली होती.कार्यक्रमामध्ये जिल्हातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य,जबाबदार नागरिक,विद्यार्थीमित्र तसेच इतर लाभार्थी सहभागी झाले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोला जिल्हातील समतादूत शुभांगी लव्हाळे,स्मिता राऊत,उपेंद्र गावंडे,मनेश चोटमल,बालाजी गिरी,विनोद सिरसाट यांनी परिश्रम घेतले.

Previous articleशरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना दूध उत्पादक कानासाठी हमी भाव मिळावा,यासाठी केले, तीव्र आंदोलन
Next articleबजरंग दल साकोलीने राबविला अनोखा उपक्रम