मुरबाड तालुक्यातील फ्युजो ग्लास कंपनीच्या कामगारांना म, न .से चा आधार!

मुरबाड दीं.२.(सुभाष जाधव) मुरबाड तालुक्यातील फ्यूजो ग्लास कंपनीच्या कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड तालुका शाखेच्या वतीने कामगारांना कामावर घ्या त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे स्थानिकांना कामावर घ्या म्हणूनच, मनसे ने पुढाकार घेऊन त्या स्थानिक कामगारांना कामावर घेण्यास भाग पाडले. त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आता टळली आहे, सर्वत्र मनसे चा बोलबाला होताना दिसत आहे.
मुरबाड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वसामान्य माणसाला आधार बनली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न असो,दवाखान्याच्या प्रश्न असो,सर्वसामान्य माणसाचा प्रश्न असो,नगरपंचायतीच्या प्रश्न असो मनसे तालुक्यात पुढे सर्सावताना दिसत आहे . मुरबाड तालुक्यातील माणसाला ऐक आधार बनली आहे. फुजो ग्लास कंपनीत जाऊन स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, मनसे तालुका अध्यक्ष कैलास चौधरी (सर), तालुका सचिव विलास चौधरी, मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले, उपतालुका अध्यक्ष भगवान घरत, तालुका अध्यक्ष गणेश साबळे, यांनी या कंपनीबरोबर चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.