सिरोंचा-आलापली महामार्गावर मोसम गावाजवळ झाड कोसळला… तब्बल पाच तास वाहतूक ठप्प…

176

 

गुड्डीगुडम प्रतिनिधी /रमेश बामनकर

गुड्डीगुडम : सिरोंचा ते आलापली महामार्गावर झिमेला फाटा ते मोसम च्या मधात रिंग वळणावर अंजनवाक नावाचा झाड आज सकाळी 7 वाजता कोसळला.
सदर महामार्गावार झाड कोसळल्याने सिरोंचा कडून येणारे बस व मालवाहतूक ट्रक व अन्य वाहन ठप्प पडली होती.आणि मोसम ते नंदीगाव ला विद्युत पुरवठा सुरू होती.झाड पडल्याने झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्या व नंदीगाव येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे.नंदीगाव येथील युवकांनी झाड काढण्याकरिता मदत करून दुपारी बारा वाजताच्या दरम्यान रस्ता खुला करून देईपर्यन्त वनविभागाचे कर्मचारी कोणीही घटनास्थळी पोहचले नाही.
सिरोंचा कडून येणारी दोन ही बस तिथेच अटकले होते.आणि अहेरी वरून सिरोंचा कडे जाणाऱ्या बस सुध्दा अडकले होते.करिता बसने जाने-येणे करणाऱ्या प्रवासाण्या त्रास सहन करावा लागला आहे. रस्त्यावरच झाड पडल्याने इकडे, तिकडे वाहनांची रांग लागली होती.रस्ताच्या कडेला रस्त्यावर कोसळण्या सारखे झाडांना वन विभागाच्या कर्मचारी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन त्या झाडांना कोसळण्या अगोदर काडून घ्यावे, जेणेकरून प्रवाशांना वेळेवर अडचण होऊ नये.अशी प्रवाशांनी आपली मनोगत बोलून दाखवली होती.