“जनता टाईम्स,द्वारा प्रा.महेश पाणसे यांचा “कोरोणा योध्दा,या उपाधीने सन्मान… – पुर्व विदर्भ अध्यक्षाचा सन्मान भुषणावह!

171

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांना पत्रकारिता क्षेत्राबरोबर,सामाजिक-राजकीय-प्रशासकीय समस्यांची सखोल जाणिव आहे.प्रा.महेश पाणसे हे अभ्यासपुर्ण असलेले व्यक्तीत्व असल्यामुळे प्रत्येक काळात,”ते,सतर्क व जागरूक असतात.
“त्यांची सतर्कता ही समाज हिताच्या दृष्टीने अनन्यसाधारण असल्याने,कोविड १९ अंतर्गत,”त्याचा,भरीव अशा संवेदनशील कार्याची,”जनता टाईम्स,नागपूर द्वारा दखल घेण्यात आली व “कोरोणा योध्दा,या उपाधीने,”जनता टाईम्स,टिमने,”त्यांना,सन्मानित केले.
प्रा.महेश पाणसे हे अनुभातंर्गत निर्णय क्षमता टिकवून ठेवणारे कर्मशिध्दांतवादी आहेत.त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातंर्गत,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पद यशस्वी सांभाळले.चंद्रपूर जिल्ह्यातील,क्रांतीकारी चिमूर नगरीत,”महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे,”लोकहितार्थ,जिल्हा अधिवेशन घेण्यात आले होते व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथे विदर्भ अधिवेशन घेण्यात आले होते.याच बरोबर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितोपयोगी अनेक उपक्रमे राबविण्यात आली.राजकीय मातब्बरांचा व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान,करण्यात आला.
कोविड १९ अंतर्गत संचारबंदी काळात,”महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा द्वारे,”जनहितार्थ,कार्य करण्यात आली.या सर्व कार्यात प्रा.महेश पाणसे यांचा बौध्दिक-श्रमीक-आर्थीक,मोलाचा वाटा आहे.
प्रा.महेश पाणसे यांच्या कार्याची,”जनता टाईम्स,ने घेतलेली दखल योग्य असून,”महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासाठी भुषणावह आहे.