भारत विद्या मंदिर कुंभा येथील( माजी) विद्यार्थ्यांनी केले अन्नधान्य व किराणा (किट)चे वाटप

140

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव : जगामध्ये आज कोरोना वायरस ने थैमान घातले असता यातच यवतमाळ जिल्यातील मारेगाव तालुका कोरोना मुक्त होता. परंतु राजुर (कॉलरी ) येथील पोझिटिव्ह महिलेच्या संपर्कामध्ये आलेला कुंभा येथील एक पुरुष शनिवारी पोसिटीव्ह आढळला. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ खबरदारी म्हणुन कुंभा येथील प्रभाग क्र.2 सील करण्यात आला. सील करण्यात आलेल्या परिसरातील नागरिकांना बाहेर जाता येत नसल्यामुळे आमच्याकडे कुणाचे लक्ष केंद्रित होईल कोण आम्हाला मदत देईल अशी आशा बाळगत असता अशोकराव भेंडाळे ASI वडकी पोलीस स्टेशन, राजुभाऊ मांदाडे व प्रा.गणेशभाऊ भेंडाळे माजी शाळा मित्रपरिवार तर्फे
काल 2;00 वाजता कुंभा गावातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामधील भागात जे आठ दिवसापासून पूर्णतः बंद आहे.

तिथे दैनंदिनी जीवनावश्यक किराणा, अन्नधान्य किटचे कोणताही गाजावाजा न करता वाटप करण्यात आले. व खऱ्या अर्थाने गरजवंताला ह्या कोरोना च्या महामारीत मदतीचा हात दिला. कुठलिच अपेक्षा न ठेवता व कुठलाच स्वार्थ न ठेवता त्यानी जे कार्य केले त्यावेळी प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे आभार मानले. व आपलूलकीची भावना व्यक्त केली.