Home शैक्षणिक पुनम बोबडेचे दहावीच्या शालांत परीक्षेत यश..

पुनम बोबडेचे दहावीच्या शालांत परीक्षेत यश..

172

परशुराम पोटे
उपसंपादक
‘पडेगाव तालुका गंगाखेड येथील वरपूडकर हायस्कूलची विद्यार्थिनी पूनम संभाजी बोबडे हिने दहावीच्या परीक्षेत 88 टक्के मार्क घेऊन यश संपादन केले.
पडेगाव तालुका गंगाखेड येथील वरपूडकर हायस्कूल पडेगाव विद्यार्थिनी पुनम संभाजी बोबडे हिने यावर्षी दहावीची परीक्षा दिली. शेतकरी कुटुंबातील असलेल्या पूनम ने दहावीचे वर्ष असतानाही रिकाम्या वेळात तिने आई-वडिलांना शेती कामात मदत केली. अभ्यासा व्यतिरिक्त मिळालेल्या वेळ शेतामध्ये घालूनही तिने 88 टक्के गुण मिळवले. गुणानुक्रमे तिने हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .तिने मिळवलेल्या यशाबद्दल वरपूडकर हायस्कूलचे संस्थापक नागनाथराव निरस, मुख्याध्यापक मुळे सर, आजोबा सोनबा बोबडे ,ग्यानबा बोबडे, सखाराम बोबडे, मुकुंद बोबडे, संभाजी बोबडे, दिगंबर बोबडे ,दत्ता, आशिष,अविष्कार, विजय, वेदांत, वैष्णवी , रामेश्वर, आदीसह वर्गमैत्रिण यांनी अभिनंदन केले.

Previous articleअभ्यासासोबत शारीरिक शिक्षण, संगीत, कार्यानुभव व चित्रकला विषय महत्त्वाचे आहेत. – पर्यवेक्षक राजेश गाडगे
Next articleभारत विद्या मंदिर कुंभा येथील( माजी) विद्यार्थ्यांनी केले अन्नधान्य व किराणा (किट)चे वाटप