Home मुंबई अभ्यासासोबत शारीरिक शिक्षण, संगीत, कार्यानुभव व चित्रकला विषय महत्त्वाचे आहेत. – पर्यवेक्षक...

अभ्यासासोबत शारीरिक शिक्षण, संगीत, कार्यानुभव व चित्रकला विषय महत्त्वाचे आहेत. – पर्यवेक्षक राजेश गाडगे

697

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि. २ : सध्या कोवीड १९ मुळे शाळा बंद आहे, परंतु शिक्षण सुरु आहे. शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल झालेले आहेत. आॅनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत. प्रत्येक विषयाचे शिक्षक विविध माध्यमांद्वारे मुलांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. शारीरिक शिक्षण, संगीत, कार्यानुभव व चित्रकला हे मुलांचे आवडीचे विषय आहेत. या स्पेशल विषयांशिवाय शिक्षण अपुरे वाटते. लॉकडाऊनमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम व योगाची गरज भासली. विविध स्पेशल विषयांच्या अनुषंगाने मुलांनी आपले छंद जोपासले. मनोरंजनाचा आस्वाद घेतला. खेळ व व्यायाम करुन रोगप्रतिकार क्षमता वाढवली.

मुंबई महापालिका शिक्षण विभागात कार्यरत असणारे स्पेशल शिक्षक आपापल्या परीने मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. मुंबई मधील महालक्ष्मी येथे ‘वात्सल्य’ आश्रम आहे. के. के मार्ग मनपा मराठी शाळा, के. के. मार्ग मनपा हिंदी शाळा क्र. १, के. के. मार्ग मनपा हिंदी शाळा क्र. २, वरळी नाका मनपा शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा संकुल व इतर जवळच्या शाळांमध्ये शिकणारी मुले या आश्रमात राहतात. के. के. मार्ग मनपा उ. प्रा. मराठी शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका नेहा राणे यांनी आश्रमाशी संपर्क साधला. शारीरिक शिक्षण विषयाचे महत्त्व, व्यायामाचे व खेळांचे महत्त्व पटवुन दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ‘वात्सल्य’ आश्रमाने आठवड्याला एक तासिका घेण्याची परवानगी दिली.

शारीरिक शिक्षण शिक्षक संजय माने यांनी या मुलांसाठी शारीरिक शिक्षण विषयाची उत्कृष्ट तासिका घेतली. गुगल मीट अॅपद्वारे मनोरंजनात्मक खेळ, व्यायाम व कृतीयुक्त गाणे (Action song) यांची सांगड घालून मुलांचे मनोरंजन केले. २९ विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली. खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी व्यायामाचा, खेळाचा व कृतीयुक्त गाण्याचा मनमुराद आनंद लुटला. संजय माने यांचा मुलगा यथार्थ याने प्रात्यक्षिकांसाठी मदत केली. पत्नी प्रीतीने कॅमेरा व्यवस्थित हाताळला. तासिकेचे नियोजन करण्यासाठी आश्रमातील कर्मचारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभले. माने सरांनी दोन तासिका देण्याची विनंती केली आहे. लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी त्यांना आशा आहे. पर्यवेक्षक राजेश गाडगे व कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी यांनी तासिकेला आॅनलाईन हजेरी लावली. व्यायाम व खेळाचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आश्रमातील मुलांच्या प्रगतीसाठी नेहा राणे यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांनी स्पेशल शिक्षकांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. शारीरिक शिक्षण विषयासोबत इतर स्पेशल शिक्षक देखील या विद्यार्थ्यांसाठी तासिका घेत आहेत. स्वाती सुर्वे (संगीत), सीमा जोशी (कार्यानुभव) व पुनम वाघमोडे (चित्रकला) या शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे.

Previous articleमुरबाड तालुक्यातील बांदल पाडा विभाग हायस्कूल खेडले तळवली चा निकाल शंभर टक्के जाहीर!
Next articleपुनम बोबडेचे दहावीच्या शालांत परीक्षेत यश..