मुरबाड तालुक्यातील बांदल पाडा विभाग हायस्कूल खेडले तळवली चा निकाल शंभर टक्के जाहीर!

159

मुरबाड दी.(२).( सुभाष जाधव) मुरबाड तालुक्यातील राष्ट्रीय जीवन विकास मंडळ , संचालित बांदल पाडा विभाग हायस्कूल खेडले तळवली, एसएससी चा निकाल शंभर टक्के लागला असून मुरबाड तालुक्यांमधील शाळांचे लक्ष या हायस्कूल कडे लागले असून सलग तिसऱ्यांदा बांदल पाडा हायस्कूल चा निकाल हॅट्रिक पूर्ण लागला आहे.
या हायस्कूल शिक्षकांनी केलेली मेहनत व विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास याचं हे फळ आहे, असे बांदल पाडा विभाग हायस्कूल खेडले तळवली यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपले प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
या परिसरामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत असून विद्यार्थ्यांवर व शाळेच्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.