वैद्यकीय व शालेय कामासाठी परगावी जाऊन एका दिवसात वापस येणार्यांना कोरोन्टीन करू नये :–आरमोरी प्रहार चे विकास धंदरे यांची काल गडचिरोली येथे भेट घेऊन पालकमंत्री यांच्याकडे मागणी

0
160

 

हर्ष साखरे तालुका प्रतिनिधी आरमोरी

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नागरिक जिल्ह्यात बरोबर वैद्यकीय तसेच शैक्षणिक सोय नसल्याने ब्रह्मपुरी नागपूर येथे वैद्यकीय उपचारासाठी तसेच आता दहावी बारावी चे निकाल लागल्याने स्वतःच्या पुढील शिक्षणाची सोय लावण्यासाठी शालेय विद्यार्थी समोरील शिक्षणासाठी अन्य जिल्ह्यात प्रवेश घेण्यासाठी ई-पास काढून जात असतात.परंतु एका दिवसात जाऊन वापस येणाऱ्याना सुध्दा संस्थात्मक कोरोन्टीन करण्याच्या शासकीय आदेश आपल्या जिल्ह्यात असल्याच्या निर्णया मुळे अनेक रुग्णाना आजारावर उपचार घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना बाहेर जिल्ह्यात जाऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे एका दिवसात इ-पास काढून वापस येणाऱ्या रुग्णावर तसेच शालेय कामासाठी जाणाऱ्या विद्यार्थी वर्गावर १४ दिवस कोरोटाइन राहण्याची सक्ती प्रशासनाने करू नये असे आदेश काढण्यात यावे अशी आग्रहाची विनंती वजा मागणी आरमोरी प्रहार संघटना तसेच प्रहारचे रुग्णमित्र विकास धंदरे यांनी मा. पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे एका निवेदनातून केली आहे