रयतेचा वाली पाक्षिकाच्या पहिल्या अंकाचे उत्साहात झाले प्रकाशन कोव्हिड१९ मुळे -झूमद्वारे प्रकाशन सोहळा संपन्न

0
90

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

राज्यभरातील उपक्रमशील शाळा आणि शिक्षकांच्या यशोगाथा जास्तीत जास्त शिक्ष्क, विद्यार्थी आणि पालक यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून डिजिटल शक्षणिक दैनिक रयतेचा वाली परिवाराने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेयांच्या जयंती दिनी व लोकमान्य टिळक यांच्या स्मृती दिनी दिनांक ०१ ऑगस्ट २०२० रोजी महत्वाचे पाऊल उचलत सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी सन्माननीय मारोती वाघमारे यांच्या हस्ते मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक पाक्षिक रयतेचा वालीचा पहिला अंक प्रसिद्ध केला आहे.
या पाक्षिकात राज्यातील ३२ शाळांच्या तर १० शिक्षकांच्या यशोगाथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.अकोला जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी अमर भागवत यांनी अकोट पंचायत समिती मधील ‘गावाला जिचा जिव्हाळा ती म्हणजे आंबोड्याची शाळा’ही आंबोडा शाळेची यशोगाथा या पाक्षिकातून सादर केली आहे.
हे पाक्षिक दैनिक रयतेचा वाली चे संपादक श्री. शाहू संभाजी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित करण्यात आले असून या पाक्षिकाच्या कार्यकारी संपादक श्रीम. सुनिता इंगळे या आहेत. पक्षिकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि आतील रचना अत्यंत आकर्षक बनविली असून त्यातील सर्वच यशोगाथा दर्जेदार आहेत. शिक्षकांच्या कार्याला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी राज्यभरातील जिल्हा प्रतिनिधी झुमद्वारे सहभागी झाले होते.अकोला जिल्ह्यातील तुळशिदास खिरोडकर, विजय चतुरकर हे जिल्हा प्रतिनिधी या सोहळ्यात सहभागी झाले होते अशी माहिती रयतेचा दैनिकाचे अकोला जिल्हा प्रतीनिधी अमर भागवत यांनी दिली.