वडधा येथे सरकार विरोधात महाएल्गार

0
96

 

अश्विन बोदेले
प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

वडधा:- दिनांक 1आगष्ट रोजी वडधा येथे सरकार विरोधी महाएल्गार आंदोलन करण्यात आले.
सरकारच्या विविध जनविरोधी धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी व जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडधा येथे सरकारच्या विविध धोरणाविरुद्ध महाएल्गार पुकारण्यात आला व विविध समस्यांच्या संदर्भात शासनाला जाग निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सरकारला विविध समस्यांच्या संदर्भात जाब विचारण्याच्या उद्देशाने महाएल्गार आंदोलन पुकारण्यात आला.
आज राज्यामध्ये कितीतरी अडचणींचा सामना सर्वसामान्य लोकांना करावा लागत आहे त्या अडचणीच्या समस्यांसंदर्भात भारतीय जनता पार्टी तर्फे सरकारच्या विरोधात हल्लाबोल महाएल्गार पुकारण्यात आला.
या महाएल्गार आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समिती सदस्य विवेक पाटील खेवले यांनी केले. तर दलित आघाडी अध्यक्ष सोपानभाऊ ऊंदीरवाडे, तसेच शिर्शी, वडधा जिल्हा परिषद क्षेत्रातील बीजेपी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात या महाएल्गार आंदोलनात सहभागी झाले होते.