शिवसेनेच्या वतीने उत्तमनगरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १००वी जयंती उत्साहात साजरी

103

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
आज उत्तमनगर खडकवासला येथे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व विचारवंत साहित्यिक, कवी, प्रबोधनकार व
समाजसुधारक, श्रेष्ठ लेखक साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे
यांची 100 वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस शिवसेना विधानसभा प्रमुख नितीनदादा वाघ व उपतालुका प्रमुख संतोष दादा शेलार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी युवासेना समन्वयक पुणे जिल्हा सुशांतबाबा खिरीड, भाऊसाहेब चव्हाण, हनुमंत काटे,शिवानंद कोणालीकर, राहुलभाऊ एलगुंडे, वैभव बिडकर, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपविभाग प्रमुख श्री. राजू ननावरे, शिवसेना शाखाप्रमुख सौ. राणीताई ननावरे यांनी केले होते.