आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मागणीला यश येणार लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत वीज बिल सवलतीचा प्रस्ताव मांडला जाईल! आ.धर्मराव बाबा आत्राम यांची माहीती

106

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- कोरोना या महामारीमुळे शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केले त्यामुळे प्रत्येकांचा रोजगार हिरावल्या गेले वीज बिल भरणे शक्य नसल्यामुळे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी गत 25 जून रोजी शासनाकडे निवेदन पाठवून वीज बिल सरसकट माफ करण्याची मागणी केले होते. त्या संदर्भात शासनाकडे हालचाली सुरू झाले असून वीजबिल माफ व सवलती देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत मांडला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे केंद्र शासनाने प्रत्येक राज्यात मार्च 2020 पासून आजपर्यंत लॉकडाऊन व संचार बंदी जारी केले.परिणामी मध्यमवर्गीय, गोरगरीब व शेतकऱ्यांच्या हाताला काम न मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी राज्याचे ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत व शासनाकडे वीज बिल माफ करून सवलत देण्याची मागणी केले, त्याचीच फलस्फुर्ती म्हणून शंभर युनिट पर्यंत वीजबिल माफीचा तसेच पाचशे युनिटपर्यंत 25 ते 75 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत मांडला जाईल व वीजबिलात माफी व सवलत मिळेल अशी आशाही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या गंभीर विषयाकडे अधिक लक्ष घालून असल्याकडेही लक्ष वेधले आहेत.