पावसाच्या सरी बरण्याकरिता चिचेवाडा येथिल शेतकऱ्यांनी वैरागड येथील पाच पांडव देवा कडे घातले साकडे.

251

प्रतिनिधी-प्रमोद किर सानं दाखल न्युज भारत. चीचेवाडा- गडचिरोली जिल्ह्यातील चीचेवाडा गवापरिसरत ऐन पावसाच्या ऋतूमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतीच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग हा पाण्याच्या अभावामुळे आपल्या शेतीची कामे करू शकत नाही. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी वर्ग निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहतो.परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे आज शेती कसायला सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे.त्यामुळे अस्तेचा भाग म्हणून चेचेवाडा येथील “गुरुदेव सेवा” मंडळ येथील सदस्य व गावातील गावकरी मंडळी यांनी पाच पांडव देवस्थान यांच्या वरती श्रधा ठेऊन सामूहिक पूजा अर्चा करून पाच पांडव देवा ला पाणी येण्या करिता साखले घालण्यात आले.व त्यानिमित्ताने पाचपंडव देवस्थान वैरागड या ठिकाणी भोजन दान शुध्या पाणी येण्याकरीता करण्यात आले.