उद्यापासून देसाईगंज तालुक्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही मिळणार कोविड लसीकरण

0
50

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

*देसाईगंज* – दि.१८ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कडून वडसा तालुक्यात उद्या शनिवार 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे. यामध्ये शहरी भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी मध्ये 50-50 टक्के सूट देण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात ०संपूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने लसीकरण केंद्रावर नोंदणी करून लसीकरण दिले जाणार आहे. उद्या तालुक्यातील 4 लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांना लसीकरण उपलब्ध होणार असून सोमवार पासून तालुक्यातील सर्वच केंद्रांवर 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण उपलब्ध होणार आहे.
पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे असे आव्हान तालुका आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.