खळबळजनक घटना, दुचाकीच्या अपघातात मेंढोली येथिल ईसम ठार, वणी- शिरपुर मार्गावरील घटना

0
44

 

वणी : परशुराम पोटे

दुचाकीच्या समोर बैल आडवा आल्याने अपघात होऊन एका ईसमाचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
तुकाराम वामन बोंडे(५२)रा. मेंढोली असे मृतकाचे नाव आहे. तुकाराम आज दि.१८ जुन रोजी सकाळी शेती उपयोगी साहित्य आणण्याकरिता आपली दुचाकी क्र.एमएच-२९ एजी-२११८ ने वणी येथे आले होते. शेती उपयोगी साहित्य व बाजार घेऊन ३:३० वाजताचे सुमारास ते वणीवरुन आपल्या गावी मेढोली ला शिरपुर मार्गे निघाले असता चारगाव चौकी जवळ त्यांच्या दुचाकी समोर अचानक बैल आल्याने त्यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व ते खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, त्यामुळे रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती शिरपुर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटना पंचनामा करून मृत्युदेह शवविच्छेदनासाठी वणीचे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
त्यांच्या पाठिमागे पत्नी एक मुलगा व मुलगी आहे.