कामरगाव येथील सरपंच साहेबराव भाऊ तुमसरे यांनी केले कामरगांव नगरीचे कायापालट

0
254

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम:- कारंजा तालुक्यातील ग्राम कामरगाव येथील सरपंच मा.साहेबराव भाऊ तुमसरे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकास कामाला शुभारंभ करण्यात आले. यामध्ये कामरगाव मध्ये मोठ मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाण्याचा लोट गावांमध्ये जात असून त्याला योग्य दिशा व गावातील पाणी गावांमध्ये मुरण्याकरिता नाल्याचे देखील काम मार्गी लावले असून.तसेच गावाचा सर्वगिक विकास होऊन गाव हागणदारी मुक्त व्हावे, याकरिता शौचालय काम देखील पूर्णपणे करण्यात आले आहे . गावातील दुर्गंधी पसरून नय व गावातील रोगराई आळा बसविण्याकरिता गावातील स्वच्छता देखील ठेवणे तेवढेच गरजेचे असून गावातील स्वच्छतेचा प्रश्न देखील मार्गी लावला असून, गोरगरिबांना रमाबाई आवास घरकुल योजना, इंदिरा आवास घरकुल योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे. एवढेच नव्हे तर शासनाकडून मदत पोहोचवणे तसेच अपंग व निराधार व्यक्तींना सतत मदतीचा हात देणारे मा. साहेबराव तुमसरे यांच्या नेतृत्वात सन 2017 रखडलेल्या कामाला सुरुवात करून ते काम लवकरच पूर्ण होईल यासाठी सतत प्रयत्न करत राहील. व कामरगाव मधील मुख्य बस स्टॉप ते विदर्भ किराणा पर्यंतच्या सिमेंटकाँक्रेट रोडच्या प्रश्न हा बरेच दिवसापासून प्रलंबीत रखडला होता परंतु अखेर मा. साहेबराव तुमसरे यांच्या नेतृत्वात कामाला शुभारंभ करण्यात आला असून लवकरच या योजना व हे काम पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. सदैव जनतेच्या कार्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी कार्य करेल असे वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केली आहे.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत