कोथरूड परिसरातील नवीन ३००बेड्स असणाऱ्या कोविड सेंटरला नगरसेवक दीपक मानकर यांची भेट.

239

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
सध्या संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यामध्ये लढा देण्यासाठी शासकीय यंत्रणा देखील कमी पडत आहे, त्यामुळे खाजगी यंत्रणा देखील तयार ठेवावी लागत आहे. याचा प्रत्यय पुणे शहरातील कोथरूड परिसरातील वाढती कोरोनाची रूग्ण संख्या लक्षात घेता, या विभागात असणाऱ्या उपलब्ध बेड्सची संख्या व वाढत्या रूग्ण संख्या यासाठी बेड्सची कमतरता जाणवत असल्याने या विभागातील एमआयटी शाळा येथे ३०० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतेय यासाठी उपलब्ध सुविधा व आवश्यक गोष्टींची पाहणी नगरसेवक दीपक मानकर यांनी भेट देऊन पाहणी केली, व माहिती घेतली. यावेळी त्या ठिकाणी सहायक आयुक्त संदीप कदम, विभागीय आरोग्य निरीक्षक राम सोनवणे व तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. या कोविड सेंटर मुळे या विभागातील रूग्णांना जवळच उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. या ठिकाणी रूग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरसेवक दीपक मानकर हे वारंवार पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.