परजिल्ह्यातील मनाई असलेल्या रेतीच्या अवजड वाहनास बंदी घालावी, अन्यथा आंदोलन, ट्रॅक्टर मालक कल्यानकारी असोशियएनचा निवेदनाद्वारे ईशारा

0
29

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहरामध्ये तसेच वणी परीसरात वरोरा, घुग्गुस या परजिल्हा असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील रेती वाहतुकदार अवजड वाहनाने रेती वाहतुक करीत आहे. मात्र अवजड वाहनाने रेती वाहतुक करण्यास मनाई आहे, असे असतांना रेती वाहतुकदार अवजड वाहनाने रेती वाहतुक करुन नियमाला धाब्यावर धरुन नियमाची पायमल्ली करीत आहे. त्यामुळे वणी परिसरातील ट्रॅक्टर वाहतुकदारांची कोंडी होत असून रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अवजड वाहनास वणी शहरासह परिसरात मनाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार शाम धनमने व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर असे की, वणी शहरासह लगतच्या परिसरात अवजड वाहनाने रेती वाहतुक करण्यास सक्त मनाई आहे.असे असुन सुद्धा मोठ्याप्रमाणात अवजड वाहनाने रेती वाहतुक केली जात आहे. सुरु असलेल्या अवजड रेती वाहतुकीस मनाई करण्यात यावी आणि जर तसे आढळल्यास प्रशासना तर्फे कारवाही करण्यात यावी, कारवाई न झाल्यास ट्रॅक्टर मालक कल्यानकारी असोशियएन वणी मार्फत अवजड रेती वाहतुकदारांचे वाहन अडवुन तिव्र आंदोलन करण्यांत येईल, असे निवेदनातुन म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी असोशियएन चे अध्यक्ष धर्मैद्र काकडे, सचिव धिरज पाते,सुमित ठेंगणे, रवि जुनगरी, गणेश बदखल, प्रमोद ताजणे, महेश वैद्य,प्रमोद बोबडे, अतुल बोबडे, अतुल हिवरकर,मनोज मिलमीले, धिरज पेचे, अनिल सोनटक्के, हरिश पाते, किशोर डवरै, कुंदन टोंगे ईत्यादींसह उपस्थित होते.