संस्कार क्रेडिट को ऑप. सोसायटीने केलेला कोरोना योद्ध्यांचा सत्कार, योद्ध्यांचा मनोबल उंचावणारे : आमदार कृष्णाजी गजबे

0
40

 

तालुका प्रतिनिधीःमहेश तागडे
दखल न्यूज भारत

तालुका प्रतिनिधी / कोरची : ” संस्कार क्रेडिट को ऑप.सोसायटी गडचिरोली ( मुख्य कार्यालय – ‘संस्कार भवन’ गांधी चौक कुरखेडा ) च्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित दिमाखदार सोहळ्यात जंगलव्याप्त, अतिदुर्गम भाग असलेल्या जिल्ह्याच्या उत्तरेकडील कोरची येथील ‘श्रीराम महाविद्यालयात  दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील जिल्हा सामाजिक उत्कृष्ट कार्य पुरस्काराने पी. डी. एज्युकेशन आरमोरी चे संस्थापक अध्यक्ष दिनेश देशमुख यांना गौरविण्यात आले, तर सहकार क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे  श्यामलाल मडावी व आसाराम सांडील यांना सहकाररत्न तर तालुका उत्कृष्ट कार्य पुरस्कारा ने समाजसेवक आशिष अग्रवाल आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. कुमारीबाई जमकातन यांना गौरविण्यात आले. विशेषतः तालुक्यातील 120 आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व कोरोना योद्ध्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
महामारी कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव असतांना देखील आपल्या आरोग्याची कसलीही पर्वा न बाळगता या कोरोना काळात आशा वर्कर्सनी अतिमागास आदिवासी बहुल असलेल्या, जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील कोरची तालुक्यात कोविड विषयी जनजागृती तथा सेवा बजावली या त्यांच्या जनजागृती कार्यांची दखल घेत सहकार क्षेत्रातील उदयोन्मुख संस्कार क्रेडिट को ऑप सोसायटी ने एक सामाजिक बांधिलकी जोपासत  त्यांच्या सेवा कार्यांना सन्मान देऊन मनोबल वाढवण्याचा महत्वपूर्ण पाऊल उचलला.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मंचावर मुख्य अतिथी म्हणून आमदार कृष्णा गजबे हे होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य देवराव गजभिये होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. नरेंद्रजी आरेकर हे उपस्थित होते.  प्रमुख अतिथी म्हणून पी. आर. आकरे, ॲड. उमेश वालदे  सौ. खोब्रागडे, बावणे, संजय शिरपूरवार ,कराडे ह्या देखील प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रास्ताविक संस्कार क्रेडिट को ऑप सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मनिष फाये यांनी केले तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार दुधबावरे चामोर्शी यांनी केले. आभार प्रा. नागेश फाये यांनी मानले, संचालक प्रशांत मोहूर्ले, हरिष टेलका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धिरज बांगरे, शुभम परिहार, राहुल गिरडकर, दिवाकर देवांगण,जगदीश कुमरे, स्वप्नील पिल्लारे, अक्षय काळबांधे रुपेश देशमुख, पायल सहारे,मुनेश पारधी,विक्की मोहूर्ले,स्वप्नील खोब्रागडे, परवेज पठाण, रामु शेंडे आदींनी परिश्रम घेतले.