केज तहसील ला कार्यरत असलेले नायब तहसीलदार सह कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा शेकापची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजकीय लोकांच्या सोयीने राहत असल्यामुळे बदल्या नाहीत – भाई गुंड

0
83

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
केज तहसील मध्ये दहा ते पंधरा वर्षापासून एकाच कार्यालय मध्ये काम करत असलेले. खुर्चीला हे कर्मचारी का धरुन बसलेत आणि यांच्यासाठी शासकीय वेगळा नेम आहे का आसा नायब तहसीलदारा सह तलाठी मंडळ आधीकरी कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

केज तालुक्यातील अनेक कर्मचारी स्थानिकलाच काम करतात या मध्ये सचिन देशपांडे हे शासकीय सेवे मध्ये रुजू झाल्या पासून ते आज पर्यंत केज तहसिल मध्येच काम करतात यांच्या वर नेमकी कोणाची मेहरबानी आहे मध्यंतरी दुसरीकडे बदली असताना डेपो टेशन पन केजलाच सेवा केली,अनेक कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी हे गेली अनेक वर्षा पासून तहसील अंतर्गत काम करतात या सर्व व कर्मचाऱ्यांचे एवढ्या वर्ष काम केल्यामुळे राजकीय हितसंबंध निर्माण झाले आहेत या मुळे सर्वसामान्य व्यक्तींना ओळखी शिवाय शासकीय काम होत नाहीत या मुळे सर्वसामान्य माणसांना पुढारी किंवा दलाला मार्फत काम करण्याची वेळ येत आहे केज तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची खूप मोठी मानसिक पिळवणूक केली जात आहे ,
नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या कडे पुरवठा विभाग निवडणूक विभाग तर कधी स्थानिक नगर पंचायतचा मुख्य अधिकारी यांच्या जागेवर चार्ज देण्यात येतो राजकीय सोयीनुसार ते चार्ज घेतात अशा राजकीय लोकांशी हितसंबंध ठेवणाऱ्या अधिकारी हा शासकीय सेवा करत नसून राजकीय खलबते करत असल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी नायब तहसीलदार सह तलाठी मंडळ अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या तात्काळ करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.