शहर वाहतूक पोलिसांची प्रामाणिकता, गरीब युवकाचे कागदपत्रे व महिलेची पर्स केली परत

0
108

 

अकोट प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोला शहरात चौका चौकात वाहतूक नियोजनाची महत्वाची भूमिका पार पडणारे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अकोल्याच्या धुळीने भरलेल्या व गजबजलेल्या चौका मध्ये वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून सतत उभे राहून आपले कर्त्यव्य तर बजावत आहेतच परंतु मागील बऱ्याच दिवसा पासून कर्त्यव्या सोबतच सर्वसामान्य नागरिकांचे घाईगर्दीने जात असतांना अनावधानाने रस्त्यात, चौकात पडलेले कागदपत्रे, मोबाईल, पाकिटे, पर्स इत्यादी वस्तू परिश्रम पूर्वक शोध घेऊन परत करीत आहेत.
असेच दोन प्रसंग आज दिनांक 17:6:21 रोजी शहरातील गजबजलेल्या अशोक वाटिका चौक व टॉवर चौकात घडले
आज दुपारी अशोक वाटिका चौकात कर्त्यव्य बजावीत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुदाम राठोड आणि कैलास सानप ह्यांना चौकात एक लेडीज पर्स पडलेली आढळून आली त्याची पाहणी केली असता त्या मध्ये मोबाईल, महत्वाची कागदपत्रे व पैसे आढळून आले, कागदपत्रा वरून सदर पर्स श्रीमती आरती प्रदीप अग्रवाल, श्री शॉपी गोरक्षण रोड अकोला ह्यांची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे सोबत संपर्क करून त्यांना अशोक वाटिका चौकात बोलावून घेऊन खात्री करून सदर पर्स त्यांना परत करण्यात आली, दुसऱ्या घटनेत टॉवर चौकात कर्त्यव्य बजावीत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अमोल लोखंडे ह्यांना चौकात एक पिशवी पडलेली दिसली, त्याची पाहणी केली असता त्या मध्ये आधार कार्ड, पास बुक, इत्यादी महत्वाचे कागदपत्रे आढळून आली त्याची पाहणी केली असता कागदपत्रा वरून सदर ची पिशवी उमेश गायकवाड, हरिहर पेठ ह्यांची असल्याची माहिती मिळल्यावरून त्यांचे सोबत संपर्क करून त्यांना टॉवर चौकात बोलावून त्यांना त्यांची महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी परत करण्यात आली, दोघांनीही वाहतूक पोलीस अमलदारांची कौतुक करून आभार व्यक्त केले.
शहर वाहतूक पोलीस अमलदारांच्या प्रामाणिक पणा बद्दल शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व सर्व स्टाफ ने त्यांचे कौतुक केले आहे.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार त्यांचे कर्त्याव्य सोबतच सातत्याने प्रमाणिकतेचा परिचय देत आहेत, आता पर्यंत शहराचे विविध चौकात कर्त्याव्य बजावत असताना सर्वसामान्य नागरिकांचे चौकात पडलेले 8 मोबाईल, 3 पाकिटे, 2 पर्स, महत्वाचे कागदपत्रे असलेल्या 3 पिशव्या वाहतूक पोलिसांनी परत केल्या आहेत, वाहतूक पोलिसांच्या ह्या सातत्यपूर्ण प्रमाणिकते मुळे वाहतूक पोलिसांची डागाळलेली प्रतिमा एक वेगळी प्रतिमा शहरात तयार झाली आहे हे निश्चितच अधोरेखित करण्यासारखे आहे.