रायगटा येथील मुख्य चौकात हायमास्ट लाईट चे उदघाटन सरपंचा सौ.शंकूतला कुळमेथे यांच्या हस्ते…..

118

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : अहेरी पंचायत समिती अंतर्गत खांदला ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या रायगटा येथे मुख्य चौकात हायमास्ट लाईट लावण्याची मागणी केली होती.
या मागणीची सरपंचांनी दखल घेऊन रायगटा येथील मुख्य चौकात हायमास्ट लाईट बसविण्यात आले आहे.
सदर लाईट चे उदघाटन खांदला ग्राम पंचायत चे सरपंचा सौ.शकुंतलाताई कुडमेथे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
याप्रसंगी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते श्री माधव कुडमेथे, रमेश पोरतेट,शंकर दुर्गे, रामशंकर अंबिलिपवार, व्येंकना कडारलावार, विमलाबाई पोरतेट आणि गावातील नागरिक उपस्थित होते.