. अंन् तरुणांच्या चेहऱ्यावरील आनंदाश्रू लपले नाहीत !! परदेशात शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्या १५० जणांनी घेतली कोविशिल्ड लस आ.शेखर निकम, आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांचे प्रयत्न लागले सार्थकी

0
42

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : ……अंन् तरुणांच्या चेहऱ्यावरील आनंदाश्रू लपले नाहीत !! घटना आहे चिपळूण शहरातील एलटाईप शॉपिंग सेंटर मधील काल मंगळवार दि.१५ जून रोजीच्या लसीकरण ठिकाणची ……..!! आई वडिलांनी खूप कष्ट – मेहनत घेऊन लाखो रुपये खर्च करून उच्च शिक्षण दिले ही कृतज्ञता नोकरी व्यवसाय करूनच व्यक्त करण्यासारखी आहे.या करिता केवळ शिक्षण महत्वाचे आहेच परंतु जगावर कोसळलेल्या महाकाय कोरोना संकटामुळे परदेशात नोकरीला जाणाऱ्या नागरिकांना कोविशिल्ड लस घेणे गरजेचे आहे अन्यथा विदेशात पाऊलच ठेवले दिले जात नाही आहे . या तरुणांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आश्रू आणण्याचे केवळ एकमेव काम कोणी केले असेल ते म्हणजे सर्वसामान्यांचे आधारस्तंभ आमदार शेखर निकम,आरोग्य सभापती शशिकांत मोदी,नगरसेवक आशिष खातू,सामाजिक कार्यकर्ते नाझीम अफवारे यांनी.
परदेशात नोकरी आणि शिक्षणासाठी जाणाऱ्या चिपळूण मधील तरुण मुले मुली यांना कोविड काळात प्राधान्याने लसीकरण मिळावे अशी मागणी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर
निकम नगरपालिकेचे आरोग्य सभापती शशिकांत मोदी ,नगरसेवक आशिष खातू यांनी रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर यांच्याकडे नुकतीच केली होती या बाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाने ताबतोब सहकार्याची भूमिका घेत
काही दिवसांपूर्वी चिपळूण शहराकरिता कोविशिल्ड लसीची उपलब्धता करून दिली.मंगळवार दि.१५ जून रोजी शहरातील एलटाईप शॉपिंग सेंटर येथे शहरातील १८ वर्ष वयापुढील नागरिक,परदेशात प्रवास करणारे नागरीक,नोकरी,
शिक्षणासाठी जाणारे नागरिक आणि ४५ वयाच्या पुढील जेष्ठ नागरिकांना टोकण पद्धतीने कोविशिल्ड लस देण्यात आली सामाजिक कार्यकर्ते नाझीमभाई अफवारे स्वतः दिवसभर लक्ष ठेऊन अत्यंत गरज असणाऱ्या मुलांना लसीचा लाभ मिळावा म्हणून मागील काही दिवस प्रयत्न करीत असून प्रशासनालाही त्यांचा मदतीचा हात मिळत आहे. अमेरिका,इंग्लंड,दुबई,दोहा कत्तर, ओमान,कुवेत,आफ्रीक,
स्विझरलँड,मलेशिया,जपान,अबुदाबी, इटली,फ्रांस या देशात शिक्षणासाठी आणि नोकरीला जाणाऱ्या मुलांना कोविशिल्ड लसीचा उत्तम उपयोग झाला .
माझे आई वडील यांनी मला संपूर्ण शिक्षणात मोलाची मदत केली प्रसंगी कर्ज काढून पैसे उभे केले आणि त्यांची ईच्छा आहे मी परदेशात नोकरीला जावे नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून घरची आर्थिक स्थिती सुधारता येईल पण मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे माझे दुबईला जाणे राहिले परंतु हे स्वप्न आज केवळ आणि केवळ आमदार शेखर निकम,आरोग्य सभापती शशिकांत मोदी,नगरसेवक आशिष खातू,सामाजिक कार्यकर्ते नाझिम अफवारे यांच्यामुळेच पूर्ण होणार आहे अशी प्रतिक्रिया एका तरुणाने येथे बोलतांना व्यक्त केली.
जिल्हा आरोग्य विभागाकडून पालिका प्रशासनांला १५० लसीचे वाटप आले होते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्वच १५० नागरिकांना लस देण्यात आली लस देण्यात आली.परदेशात जाणाऱ्या नागरिकांना सोमवारी पोलीस स्टेशन हॉल येथे बोलविण्यात आले होते महसूल प्रशासनाने त्यांचा पासपोर्ट,
व्हीजा, आधारकार्ड ,कागदपत्र आणि परदेश प्रवासाची सत्यता पडताळूण त्यांना टोकण दिले.या करिता आमदार शेखर निकम,पालिका आरोग्य सभापती शशिकांत मोदी ,नगरसेवक आशिष खातू,जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर,
तालुका आरोग्य अधिकारी जोती
यादव,मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते,सामाजिक कार्यकर्ते नाझिम अफवारे , राजू खातू आणि पालिका कर्मचारी यांचे विशेष सहकार्य मिळाले.आ. शेखर निकम,जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा आरोग्य सभापती शशिकांत
मोदी,नगरसेवक आशिष खातू,सामाजिक कार्यकर्ते नाझीम अफवारे यांचे लस घेतलेल्या अनेकांनी आभार मानले.

फोटो : मंगळवारी देण्यात आलेले कोविशिल्ड लस घेतांना ४५ वयापुढील जेष्ठ नागरिक, आरोग्य सभापती शशिकांत मोदी आणि आरोग्य कर्मचारी छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

*दखल न्यूज भारत*