५ वर्षापासून गरजू रुग्णांसाठी राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप ची २४.तास निस्वार्थ सेवा ग्रुप चे आरोग्य अधिकारी जि. सा. रु. यांच्याकडून अभिनंदन

0
24

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम: संभाजी ब्लड डोनर ग्रुप वाशिम जिल्हा, मानवतेसाठी राबविलेल्या विश्वात्मक या रक्ताच्या दिव्य चळवळीमध्ये आपल्या मौल्यवान सहकार्यातून रुग्णास जीवदान मिळावे या जगातील सर्व श्रेष्ठ दानात रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समजले जाते. आपणास सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा हा वाशिम जिल्ह्यातील एकमेव लोक प्रसिद्ध राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप वाशिम जिल्हाa यांच्या वतीने गेले. ६ वर्षापासून गरजू रुग्णांना रक्त पुरवण्याचे निस्वार्थपणे कार्य करण्यात येत आहे.
राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्तेक जिल्ह्यामध्ये कुठल्याही नागरिकाला व रुग्णाला रक्ताची गरज भासत असल्यास त्यांना तात्काळ ब्लड ची उपलधी ग्रुपच्या सदस्याच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून केली जात आहे. वाशिम ,अकोलाs अमरावती, हिंगोली, नांदेड, बुलढाणा औरंगाबाद , शिर्डी , सह महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यामध्ये मदत करण्यात येत आहे. या कार्याची दखल घेत २०१९ चा मध्य प्रदेश भोपाळ येथील एन जी ओ.ने इंटरनॅशनल आयकॉन पुरस्काराने व राष्ट्रीय इंडियन द रियल सुपर हिरो या. पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे. राजे संभाजी ग्रुप चे नेटवर्क जाळे व्हाट्सअप च्या माध्यमातून विणले असून प्रत्येक गावांमध्ये व्हाट्सअप च्या माध्यमातून सदस्य जुळवून एक परिवार उभा केला आहे.
जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर ,कारंजा ,रिसोड, मानोरा, मालेगाव,प्रत्येक जिल्हा मध्ये दर महिन्याला ब्लड डोनेशन कॅम्प आयोजीत करून जिल्हा सामान्य रुग्णालय रक्त पेढी व जिल्ह्यातील नागरिकांना महान निस्वार्थपणे रक्त पुरवण्याचे काम या राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोणा सारख्या महाभयंकर काळामध्ये देखील रक्ताची कमी न भासुदेता देताs दारोज १० ते १२ डोनर पाठून रक्त पुरविण्याचे काम.. या काळामध्ये करण्यात आले १७ ब्लड कॅम्प घेतले . असून इतकेच नव्हे तर अनेक रुग्णांना प्लाझ्मा ब्लड ची गरज भासत होती. तर निस्वार्थपणे प्लाझ्मा दान करून व कोविड काळात महान कार्य करण्यात आले आहे. या कार्यामध्ये सर्व मित्र मंडळाचे तरुण युवक युवती महिला चे मोलाचे कार्य लाभत असल्याने मानव सेवा राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुपच्या कार्य तून घडत आहे. आपल्या नसा तून माणुसकी वाहिली नाकी माणूस आणि माणूस पण जिवंत राहत आहे. रक्तदान करू या माणुसकीला वाचवूया या वाक्याप्रमाणे महाराष्ट्रभर कार्य करण्यात येत आहे. 14 जून जागतिक रक्तदान दिनाच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी विभागामध्ये अनेक सदस्यांनी रक्तदान करून जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात आला या महान कार्याची दखल घेत जिल्हा सामान्य रुग्णालय चे जिल्हा चिकित्सालय आरोग्य अधिकारी डॉ. अहिरे साहेब यांच्या हस्ते राजे संभाजी ब्लड ग्रुप चे अध्यक्ष व सर्व सदस्य यांचा सन्मानपत्र देऊन अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत