
अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालला असून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवार सकाळपर्यंत जनता कर्फ्यु लागू केला असून संचारबंदीची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आज शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
शुक्रवारी सायंकाळी सात वाजल्यापासून ते सोमवारी सकाळ पर्यंत हि संचारबंदी लागू राहणार आहे या संचारबंदीचे पालन अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे