अत्यंत दुःखद घटना वीज कोसळून तरुणीचा मृत्यू

464

विश्वदिप नंदेश्वर / प्रतिनिधी

आमगाव :-तालुक्यातील धामनगाव येथील घटना, आज दि. ०१-०८-२०२० ला सायंकाळी सुमारे ४ वाजता दरम्यान अचानक वादळ वाऱ्यासह विज कोसळली त्या विजेच्या प्रकोपात मजुरीच्या आशेने शेतावर भातपिकाची रोवणी करण्याकरिता गेलेली कु.पुजा पुरुषोत्तम राठोड मानकर कॉलेज आमगाव येथे पॉलिटेक्निक ला प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. जगात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने व सर्व शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे फावला वेळ घालवण्याकरिता ती रोवणी करायला गेली असता तिथे विज कोसळून ती जागीच ठार झाली,व तिच्यासोबत असलेल्या आठ महिला घायाळ अवस्थेतच होत्या त्यांना रुग्नालयात त्वरीत दाखल करुन उपचार सुरू आहे.
या घटनेची पूर्ण आमगाव परिसरात खळबळ माजली आहे, जणू दुःखाचा डोंगर राठोड परिवारावर कोसळला.