मुंडगाव येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

0
138

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती नागरीकांनी मोठ्या उत्सवाने साजरी केली व परंतु हा कार्यक्रम साजरा करतांना मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंडगाव मधे यंदाची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेश गवई, गजानन गवई, गजानन तायडे, महादेव तायडे, श्रावण अवचार ,सुधिर गवई यांच्या मागदर्शनातुन जयंती साजरी करण्यात आली. साहित्य सम्राट लोकशाहीर यांचा आदर्श डोळ्या समोर घेऊन दहावी मध्ये 94.80% गुण मिळवणाऱ्या अक्षय संतोष पवार गाव (एदलापूर ) याचा यावेळी सत्कार घेण्यात आला जयंतीच्या माध्यमातून तसेच मातंग समाजातील मुलांनी मुलींनी शिक्षणा मध्ये जास्त प्रमाणात लक्ष घालून समाजाचे नाव शिखरावर नेण्याचा प्रयत्न करावा असे अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष सुरेश गवई यांनी सांगितले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच लाँकडाउन लक्षात घेता कमी जनसंख्येत आणी शासनाच्या नियमांचे पालन करुन मुंडगाव येथे अंण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन युवा आगाडीचे जिल्हापाध्यक्ष समीर पठान, सचिन सरकटे, हिरा, सरकटे, वतन सरकटे श्रावण अवचार यांची उपस्थिति होती.