साकोली येथे श्रीनगर कॉलनी व प्रगती कॉलनी प्रतीबंधीत क्षेत्रात

165

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली येथील श्रीनगर कॉलनी व प्रगती कॉलनी या भागात कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सेंदुरवाफा येथील श्रीनगर कॉलनी व साकोली येथील प्रगती कॉलनी हा भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून दिनांक ३१जुलै२०२०रोजी घोषित करण्यात आले.सदर भागाच्या येणारे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले.सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधीत क्षेत्राचे बाहेर जाण्यास व येण्यास पुर्णतः प्रतिबंधीत करण्यात आले आहे.सदर आदेश दिनांक ३१जुलै२०२० रात्री ८वाजता पासून पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.