कुडेसावली येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

119

 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
प्रसेनजीत डोंगरे
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
8275290099,

गोंडपिपरी. तालुक्या अंतर्गत येत असलेल्या कुडेसावली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आज १ आगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती कुडेसावली, मारोती मडावी सरपंच ग्रामपंचायत कुडेसावली, व राजेश डोडीवार उपसरपंच कुडेसावली यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त सर्व विद्यार्थ्यांना निःशुल्क नोटबुक व पेन वाटप करून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यानी कोरोना संकटकाळात टाळेबंदीचे काटेकोर पालन करीत सहभागी झाले.
कोरोना महामारीमुळे देशावर मोठे संकट कोसळले, अशा परिस्थितीत मानवी जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहेत. सतत च्या टाळेबंदी मुळे सर्व शिक्षण व्यवस्था पूर्णता ठप्प झाले आहे. अशातच ग्रामीण भागातील विद्यार्थी नोटबुक व पेन पासून दुरावल्या गेले, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ज्योत सतत तेवत राहावी, यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे निमित्त साधून विद्यार्थ्यांना टाळेबंदी च्या काळात सुद्धा शिक्षणाचे धडे गिरवत रहावे हा उदात्त हेतू समोर ठेवून गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती व गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन व इतर लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी मारोती मडावी सरपंच ग्रामपंचायत कुडेसावली, उदघाटक मधुकर मोरे, राजेश डोडीवार उपसरपंच, गुणसागरजी रायपुरे सामाजिक कार्यकर्ता, प्रा. प्रशांतजी नारनवरे, भोगेकर मॅडम,रंजित इदे, कृष्णा वाघाडे, बाबा मडावी, रोहित गेडाम या मान्यवरांसह अनेक नागरिक उपस्थित होते, सूत्र संचलन संजूभाऊ चामलाटे यांनी तर आभार रत्नदीप माऊलीकर यांनी मानले.