Home महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील “महाएल्गार आंदोलन, मोठ्या संख्येने सहभागी नागरिकांची उपस्थिती महाविकास...

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील “महाएल्गार आंदोलन, मोठ्या संख्येने सहभागी नागरिकांची उपस्थिती महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो ! आमदार कृष्णा गजबे आंदोलनात भाजपा व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

314

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

देसाईगंज – मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी देण्यात यावी या प्रमुख मागणी करिता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्टींमध्ये जनतेला वेठीस धरण्याचे काम हे सरकार करीत आहे. अगोदरच आर्थिक अडचणीत असणाऱ्या सामान्य माणसाला कोणताही आधार न देता उलट विजेचे ४ पट बिल देऊन मोठा धक्का दिला आहे. तसेच दूध उत्पादकांना भाजपा सरकारच्या काळात देण्यात येणारी प्रती लिटर ५ रु सबसिडी बंद करून राज्यातील जनतेवर राज्यातील शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारने मोठा आघात केला आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार सामान्य जनतेच्या भावनांशी खेळत असल्याने व सर्वच कामात अपयशी ठरलेल्या या सरकारने आता जनतेच्या विरोधात निर्णय दिल्यास त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील असा इशाराही मा किसन जी नागदेवे भाजपा जिल्हा अध्यक्ष व आ कॄष्णा गजबे आरमोरी वि स क्षेत्र यांनी सरकारला दिलेला आहे. सरकारने तातडीने मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादकांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी द्यावी, दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्यात यावा, दूध भुकटीच्या निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे व मागील खरीप (एप्रिल) महिन्याचे रब्बिचे बोनस देण्यात यावे अशी मागणी घेवून महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात “महाएल्गार आंदोलन” करण्यात येत असल्याची माहिती आ.कृष्णा गजबे यांनी दिली आहे. या आंदोलनामध्ये जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्ते हजारों चा संख्येने उपस्थित होते. यावेळी शालुताई दंडवते नगराध्यक्षा न. प. वडसा, श्यामजी उईके, राउत मॅडम नगर सेविका न. प. वडसा, चैतन्यदास विधाते, लालाजी रंटकेव व तालुक्यातील भारतीय जनता पार्टिचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleआमदार भास्करराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित गुहागर सेनेचा आदर्श उपक्रम सुनील पवार यांनी दिले कोविड सेंटरला ५० ताट आणि पेला संच
Next articleकुडेसावली येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी