उमरेड तालुक्यातील बेला पुर्ती साखर कारखान्यातील बाँयलर मध्ये स्फोट;५ जणांचा जागीच मृत्यू

 

सुनील उत्तमराव साळवे
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

बेला- उमरेड /नागपुर : १ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात बेला येथे पुर्ती साखर कारखान्याच्या मानस ॲग्रो युनिट क्रमांक १मध्ये आज दुपारी २.१५ मि.बायोगॅस मोलॅसिस उत्पादन टंक दुरुस्तीचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला.
प्राप्त माहितीनुसार या भीषण स्फोटांच्या घटनेत ५ कामगार हे वेल्डिंगचे काम करीत असताना जागीच ठार झाले . म्रृतकात वेल्डर १) सचिन वाघमारे वय २७ , २) मंगेश पभाकर नौकरकर वय २३ , ३) वासुदेव लडी वय ३४ , ४) प्रफुल्ल पाडुरंग मून वय २५ , ५) लीलाधर वामन शेंडे हे सारे रा.वडगाव बेला येथील कर्मचारी अाहे.