लखमापूर (बोरी) येथे रोडवर केली धानरोवनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चा उपक्रम

152

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी

लखमापूर( बोरी )गावात रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडले असून या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे म्हणून त्या चिखलात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या कार्यकर्ते यांनी धानरोवनी केली
पावसाळ्यात रस्त्याची वाताहत झाली आहे.यामुळे या परिसरातील नागरिकांना चांगलाच त्रास वाढला आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी केली मात्र या बाबतीत शासन लक्ष देत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष नेमाजी घोगरे,राष्ट्रवादी युवक कार्यकर्ता अतुल भरसागडे,प्रितम घोगरे,नारायण पिपरे,दिलीप सुरजागडे,आनंदराव पीपरे,परशुराम वासेकर आदींनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रोडवरच धानरोवनी केली
आतातरी शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने करण्यात येत आहे.