एकल आरोग्य फाऊंडेशन तर्फे गरजुना धान्य व औषध तथा इतर वस्तुचे माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव यांचे हस्ते वितरण कोरोना लसीकरण मोहिमेत सर्व जणतेनी सहभागी व्हावे – माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम

0
45

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी – अहेरी तालुका मुख्यालयापासुन १७ किमी अंतरावर असलेल्या मौजा बोरी येथील जि.प.शाळेच्या सभागृहात गरजुना धान्य,औषधी तथा इतर वस्तुचे कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते….
# कोरोना संकटाच्या कळात मागील दिड महिन्यांपासून लाॅकडाऊन सुरु असल्याने गरिब लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.त्यांचे हाताला काम मीळत नसल्याने त्यांना जेवनासह इतर अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.समाजाप्रति आपले सुध्दा काही देणे आहे अशी सामाजिक बांधीलकी जोपासत *”एकल आरोग्य फाऊंडेशन “* आलापल्ली अंचल लगाम संच यांचे तर्फ अहेरी तालुक्यातील बोरी परिसरातील वीस गावातील पन्नास चे वर एकल प परिवारातील एकल आचार्यांना अन्नधान्य,औषधी,मास्क व इतर जीवनावश्यक वस्तूंची कीट माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना राजे अंबरीशराव यांनी सांगीतले की,या कोरोणाचे संकटात कुणीही घाबरुन न जाता आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे. प्रकृती थोडी जरी बरी वाटत नसेल तर जवळील रुग्णालयात तुरंत जावे.औषधोपचाराने कोरोणा दुर होतो.आपण कोणत्याही अप्रचाराला बळी न पडता कोरोणाची लस आपण प्रथम घ्यावी व नंतर आपल्या परिवारासह गावातील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे.लस घेतल्याने आपण कोरोणा पासुन दुर राहु शकतो.आदिवासी समाजात कोरोणा लसी बाबत जो गैरसमज व अंधश्रद्धा पसरली आहे ती एकलच्या स्वयंसेवकांनी लोकांमध्ये जात जनजागरन करत ति दुर करावी.सर्वांनी शासनाच्या या लसीकरण मोहिमेत सामील होत शंभर टक्के लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी केले…
यावेळी युवानेते अवधेशरावबाबा आत्राम, सीताराम भैया सोनानिया,सुरेश गड्डमवार,भाजपा तालुका अध्यक्ष तथा एकल समितीचे अध्यक्ष रवी नेलकुद्री, एकल समितीचे उपाध्यक्ष संतोष मद्दीवार,सचिव सुधाकर मद्देर्लावार,भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, मुकेश नामेवार, बोरी चे सरपंच शंकर कोडापे,राजपुर पॅच चे सरपंचा मीना वेलादी,महागावचे उपसरपंच संजय अलोने,माजी उपसरपंच तथा लगाम संचाचे अध्यक्ष स्वप्नील गुंडावार,गिरीश मद्देर्लावार ,नितीन गुंडावार,अखिल कोलपाकवार, लगाम संच प्रमुख साईबाबा सदनपवार तसेच एकल विध्यालयाचे सर्व पूर्णकालीन कार्यकर्ते मिलिंद आलम, दिलीप मेश्राम, राकेश सोयाम, संजू चौधरी व आचार्य (शिक्षकगण) तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन तथा आभार एकल अभियान अंचल प्रमुख नरेश गड्डमवार यानी मानले.