राजाराम उप पोलिस ठाण्यात “दादालोरा खिडकी” चे शुभारंभ खिडकीतून 30 जातप्रमानपत्र,1अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड वाटप करून केले उदघाटन

0
83

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- अहेरी तालुक्यातील उप पो.स्टे.राजाराम खांदला येथे आज 10 जून रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा.,मा.अप्पर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया सा,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख सा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सा यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उप पो.स्टे.राजाराम खां येथे पोलीस दादालोरा खिडकीचे उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिती अहेरीचे सभापती मा.भास्करभाऊ तलांडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील सत्यम भांडारवार, अधिवक्ता हनमंतु आकुदरी व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. नागरिकांना उप पो.स्टे.राजाराम येथे पोलीस दादालोरा खिडकी सुरू करण्यात आलेली असून सदर पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत विविध योजना मोफत लाभ नागरिकांना देण्यात येत आहे या बाबत माहिती उप पो स्टे चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी देऊन गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास कार्यक्रमांतर्गत उप पो.स्टे.राजाराम कडून कृषी विभागाच्या सर्व योजना, विविध शासकीय योजनेची माहिती देण्यात आली. तसेच आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जॉब कार्ड, राशन कार्ड तसेच मोफत झेरॉक्स व ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्या बाबत माहिती देण्यात आली. सदर दादालोरा खिडकीतून 20 जातप्रमाणपत्र, 1 डोमिशील दाखल व आधारकार्ड यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी उप पो स्टे चे पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक केशव केंद्रे, CRPF चे पोलीस निरीक्षक अखिलेश पाठक, SRPF चे पोलीस उपनिरीक्षक मेश्राम व जिल्हा पोलीस चे अंमलदार हजर होते.