अजब गजब बातमी कोरोना काळात…… बायकोने केली नवऱ्याची दाढी बायकोची धमाल अदेचा व्हिडीओ व्हायरल

0
247

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

महाराष्ट्र:- वर्ष उलटल्यानंतरही कोरोनाच (Corona) संकट अद्याप सरलेलं नाही. त्यामुळे सर्वजण घरीच असून कार्यालयातील कामही घरीच करत आहेत. अनेकांनी आपल्या आवडीचे पदार्थ ही घरीच ट्राय करायला सुरुवात केली आहे. त्यात पुन्हा सलून बंद झाल्याने अनेकजन दाढी आणि केस कापण्यासारखी कामेही घरीच करत आहेत. या सर्वाचे व्हिडिओही (Viral Video) आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असून असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला घरीच आपल्या नवऱ्याची दाढी करत आहे. या संपूर्ण व्हिडिओला एक बॉलीवुडमधील गाण (Bollywood Song) देखील लावलं असून बायकोटी व्हिडीओतील रिएक्शन
पाहण्यासारखी आहे.

काय आहे व्हिडीओ
‘ayushi__rohilla’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये नवऱ्याची वाढलेली दाढी त्याची बायको घरीच केस कापायच्या मशीनने करताना दिसत आहे. या सर्वाचा व्हिडीओ रेकॉर्ड होत असतानाच अचानक बायकोची नजर कॅमेऱ्यात जाते आणि ती खुदकन हसते. तिची ही मजेशीर रिअॅक्शन पाहण्याजोगी आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. इंन्स्टाग्रामवर असे बरेच व्हिडीओ असतात दरम्यान या व्हिडीओने आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांटी पसंती मिळवली आहे. तसेच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत असून त्यावर कमेंट देखील करत आहेत.