लोकनेते दी. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई मुंबईला नाव देण्यात यावे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने साखळी आंदोलन?

0
12

मुरबाड दीं.10.(सुभाष जाधव) मुरबाड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीं. बा. पाटील साहेब यांचे नाव देणे करता साखळी आंदोलन करण्यात आले.
स्वर्गीय दि बा पाटील साहेब हे निस्वार्थी निष्कलंक नेता 1952 साली जिल्हा बोर्डाची निवडणूक नंतर ते 1954 ते 19 80. पर्यंत पाच वेळा विधानसभेवर निवडून जाणारे आमदार 1983 ते 1984 या कालखंडात विरोधी पक्षनेते पद भूषण अशी जवळपास 46 वर्षांची यशस्वी विधिमंडळातील असून भ्रष्टाचाराचा एकही डाग असलेला हा नेता मुंबई बेळगाव संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याकरिता उपयोजना आंदोलन उभे केले विधिमंडळ कारकिर्दीत कूळ कायद्याच्या अंमलबजावणी मधील शेतकरी हिताच्या तरतुदी करणारे. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये अनेक पुरोगामी बदल घडवणारे नेते महाराष्ट्राचा महसूल कायदा कुळ कायदा सैनिकांच्या नावावरील जमिनी कूळ म्हणून ठेवण्याचा कायदा सातबाराच्या उताऱ्यावर तलाठ्याने अधिकार काढून घेणारा कायदा वरच्या शेतातील पाणी खालच्या शेतात सोडणारा कायदा गर्भजल परीक्षेला विरोध करणारा कायदा सिडको आणि एम आय डी सी संदर्भातील भूसंपादनाचा कायदा पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा अशा महाराष्ट्रातील बहुसंख्य पुरोगामी कायद्यांमधील बदल दी. बा. पाटील विधिमंडळातील उपसूचना मुळे घडले आमचे विधिमंडळातील विरोधी बाकावरील अभ्यास पूर्ण नेतृत्व न भूतो न भविष्यती आहे म्हणूनच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील. साहेब यांच्याशिवाय दुसरे सार्थक आणि समर्पक नाव असू शकणार नाही.
याकरिता भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुक्यातील सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब माझी पंचायत समिती उपसभापती दीपक भाऊ खाटेघरे. राजेश पाटील. पंचायत समिती सभापती दीपक भाऊ पवार. माजी नगराध्यक्ष शितलताई तोंडलेकर. किसन कथोरे उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी. दिपाली सेकुलर चे जिल्हाध्यक्षरवींद्र चंदने. आरपीआयचे तालुका अध्यक्ष दिनेश उघडे. अनुसूचित जाति मोर्चा अण्णा साळवे. सर्व मुरबाड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी उपस्थित होते तसेच या साखळी आंदोलनासाठी तालुक्यातून ग्रामपंचायतीने पाठिंबा दर्शविला असून आगरी युथ फाऊंडेशन व आदिवासी संघटने यांनीसुद्धा लेखी पाठिंबा दर्शविला आहे.