भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सीड बॉलचे वाटप

0
98

पिंपरी चिंचवड : राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हणजे शक्तीप्रदर्शन, दिमतीला कार्यकर्त्यांची फौज, फटाक्यांची आतषबाजी असे चित्र सर्रास पाहावयास मिळते. याला मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील अपवाद आहेत. ते आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात. त्यानिमित्ताने भाजप महीला मोर्चाच्या कोषाध्यक्षा शैला मोळक यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील चर्होली विभागात अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी बनविलेले सीड बॉलचे वाटप भाजप महीला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, महीला मोर्चाच्या कार्यकारणी सदस्या कोमलताई काळभोर, किसान मोर्चाचे अध्यक्ष संतोष भाऊ तापकीर, ओबीसी मोर्चा पि. चि. शहर अध्यक्ष भाऊसाहेब रासकर व इतर भाजपाचे आजी माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.