नेरीच्या बाजारपेठेत व्यापारी व नागरिकांची कोरोना अँटिजेंन तपासणी 95 नागरिकांची कोरोना तपासणी केली असून, सर्वच निगेटिव्ह

0
41

 

प्रमोद राऊत दखल न्यूज भारत

शहरासह गावखेड्यात कोरोनाने कहर केला. अन यात अनेक नागरिकांचा जीव गेला. यामुळं नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नेरीच्या मुख्य बाजारपेठेतील व्यासपीठावर कोरोना अँटिजेंन तपासणी करण्यात आली.
नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जवळपास 20 ते 25 गावखेडे येत असून, त्यातील अनेक गावांत सर्दी, तापाचे रुग्ण होती. कोरोना तपासणी करण्यासाठी गेले असता. तिकडेच रुग्णालयात ठेवत असल्या कारणाने अनेक नागरिकांनी कोरोना तपासणीला फाटा दिला असून, खाजगी डाँक्टरकडे उपचार करीत होती. यावेळी खाजगी डाँक्टरकडे तुफान गर्दी राहात होती. यात काही बोगस डाँक्टरांची सुद्धा चांदी झाली असून, काल नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नेरीच्या मुख्य बाजार पेठेच्या चौकातील व्यासपिठावर कोरोना अँटिजेंन तपासणी शिबीर लावण्यात आले. यात नेरी व परिसरातील भाजीपाला विक्रेते व इतर व्यापारी तसेच नागरिकांनी स्वतः येऊन कोरोना अँटिजेंन तपासणी केली असता. एकूण 95 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात सर्वच व्यक्ती अँटिजेंन तपासणीत निगेटिव्ह आढळली. तेव्हा त्यांना खूप मोठा आनंद व्हायचा व दुसऱ्याला आपुलकीने सांगायची की मी निगेटिव्ह आहो म्हणून.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरीचे टी. बी. भोयर आरोग्य सहाय्यक, एन. आर. हजारे आरोग्य पर्यवेक्षक, बी. एम. वाघ आरोग्य सेवक, आर. एन. उताणे आरोग्य सेवक, पी. एस. बन्सोड आरोग्य सेवक, जी. एन. भानारकर प्रयोगाशाळा सहाय्यक इत्यादी अँटिजेंन तपासणी करतांना उपस्थित होते.