विश्व योग दिवसाच्या निमित्त प्राणायाम महायज्ञाचे आयोजन

0
63

 

अकोट प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

यवतमाळ योग आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व लाभदायक घटक आहे सध्या कोरोनाच्या काळात योग प्रकृतीसाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय योग महासंघाच्या वतीने जागतिक स्तरावर प्रथमच ऑनलाइन प्राणायाम महायज्ञाचे आयोजन केलेले आहे दिनांक 21 जून 2021 ला सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिवसभरातून 21 मिनिट प्राणायाम करून प्राणायामाच्या माध्यमातून या प्राणायाम महायज्ञामध्ये आपल्याला सहभागी होऊन आहुती टाकायची आहे..आपण सर्वजण या कोरोना साथीच्या नकारात्मक काळामध्ये प्राणायामाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवित आहोत सर्वांच्या सहकार्याने आपण प्राणायामाच्या सामर्थ्याने जगाला आरोग्य प्रदान करू शकतो, व या ऑनलाइन प्राणायाम महायज्ञामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या परिवारास सहित दोस्त मित्रांसाठी आणि शुभचिंतकां सहित सहभाग घेऊन अशा या बिकट परिस्थितीमध्ये संपूर्ण जगासमोर सकारात्मक उदाहरण मांडू असे आवाहन अखिल भारतीय योग महासंघाने केले आहे.. तसेच कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे ,परंतु जर कोणाला जागतिक पातळीवर विश्वविक्रम सहभागी प्रमाण पत्र पाहिजे असल्यास कमीत कमी 99 रुपये शुल्क पडेल.
याबद्दल अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे संयोजक
राकेश भारद्वाज
(अखिल भारतीय योग महासंघ जयपुर राजस्थान)
9509530609
प्रेमदास पकडे
(श्री नंदानु योग निसर्गोपचार केंद्र यवतमाळ महाराष्ट्र)
8600891411
अशी माहिती श्री नंदानु योग निसर्गोपचार केंद्राचे संचालक प्रेम सर यांनी पत्रकारांना पत्रकार परिषद मधून दिली.