सिंदेवाही पोलिसांची पकडली टेम्पो सहीत 12 लाख ची अवैध दारू 

0
66

.
तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी 8275553131
आज दिनांक 09/06/2021 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी श्री मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर पोलीस हवालदार देवानंद सोनुले पोलीस शिपाई राहुल रहाटे ,मंगेश श्रीरामे, दादाजी रामटेके, ज्ञानेश्वर ढोकळे, सतीश निनावे , रणधीर मदारे असे मिळून शिवाजी चौक सिंदेवाही याठिकाणी नाका-बंदी करून अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये टरबूज वाहतूक करीत असल्याचे वाहनचालकाने सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यावरून सूक्ष्म झडती घेतली , असता गाडीचे आतील बाजूस चोर कप्पा तयार करून त्याचे आत मध्ये दारूने भरलेल्या पेट्या दिसून आल्या. एकूण खालील प्रमाणे माल मिळून आला.
1 ) देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीची प्रत्येकी 90 मिली च्या एकूण 5000 शिशा.
किंमत रुपये *5,00,000* /-

2 ) अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो गाडी किंमत *7,00,000* /- रुपये
एकूण किंमत *12,00,000* /- रुपये

आरोपी
1) क्षितिज भिमराव खेडवार , 24 वर्ष रा.समुद्रपूर जिल्हा वर्धा.
2) अमोल चिंधुजी देशमुख , 29 वर्ष रा. नागपूर.
अवैध दारु विक्रेत्यांकडून अशा विविध युक्त्या दारू वाहतूक करण्याकरिता केल्या जात आहेत , सिंदेवाही पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पडलेला आहे.
नमूद मुद्देमाल व आरोपी यांचे विरोधात सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत