शिवसेना घुग्घूस तर्फे बलात्काराच्या आरोपी ला कठोर कारवाई ची मागणी

0
134

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

शुक्रवार 4 जून रोजी शांतीनगर वसाहती मध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध महिलावर सकाळी 6 वाजता आरोपी मोहम्मद यासीन नूर या युवकाने बलात्कार केल्याची घटना घुग्घूस येथे घडली.

भविष्यामध्ये असे कृत्य गावामध्ये घडू नये या करिता दि. ७ मे रोजीशिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे यांचा मार्गदर्शनाखाली घुग्घूस शिवसेना शहर प्रमुख सतीश बोंडे यांनी निवेदन द्वारे आरोपी वर कठोर कारवाही करावी अशी मागणी घुग्घूस पोलिस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या कडे निवेदना द्वारे करण्यात केली . निवेदन देताना युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, महिला आघाडी घुग्घूस प्रभारी शहर अध्यक्षा संध्याताई जगताप,जयश्री ताई , युवासैनिक चेतन बोबडे , सतीश गोहोकार आदि उपस्थित होते.