विविध संघटनेच्या वतीने नवनित राणा यांचा जाहीर निषेध SC समाजाची फसवणूक केली म्हणून जाहीर माफी मागुन राजिनामा द्या

0
38

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
आज दिनांक 9 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती समोर नवनीत राणा यांचा विविध संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी नवनीत राणा मुर्दाबाद, राजीनामा द्या, SC समाजाची फसवणुक, RSS प्रणित लोकांकडुन राखीव मतदार संघावर डल्ला अशा घोषणाबाजी व पोस्टर द्वारे निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी, आँल इंडिया पैन्थर सेना, रिपब्लिकन सेना, मल्हार संघटना, धम्मदेसना फाऊंडेशन, एल्गार संघटना, भीम शक्ति संघटना, आदी अनेक सामाजिक संगठनांनी समाजाची फसवणूक केल्याबद्दल नवनीत राणांचा निषेध व्यक्त केला.

मुंबई उच्च न्यायालयने खोट्या जात प्रमाणपत्रावर अमरावती लोकसभा निवडणूक लढलेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असुन त्यांच्या वर संविधानिक घटनात्मक फसवणूक केल्या प्रकरणी दोन लाखाचा दंड ठोकण्यात आला.
महाराष्ट्रात SC म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांसाठी लोकसभेत एकूण ३ जागा राखीव आहेत पण जातचोर लोक लाभाचे पद मिळवण्यासाठी कोणत्याही स्थरावरजातात पण यांच्यामुळे तो जातप्रवर्ग आपल्या खऱ्या प्रतिनिधित्वला मुकतो. आणि हे लोक ज्यांना शुद्र अस्पृश्य म्हणून हिणवले जाते त्याचेच जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवून फायदे घेऊन परत स्वतःला श्रेष्ठ समजतात. अनुसुचित जाती प्रवर्गातील लोकांच्या हक्काचे कोणतेही काम संसदेत होत नाही.
नवनीत राणा यांनी खोटं जात प्रमाणपत्राच्या प्रकरणातुन अनु.जाती चे सद्यस्थितीत प्रतिनिधित्व आमचं मुळीच नाहीये असे म्हणण्याची वेळ समाजावर येऊन ठेपली आहे. अनु. जातीच्या मतदारसंघात केलेली ही मोठी घुसखोरी आहे. समाजाची मोठी फसवणूक आहे. नवनीत राणा आणि संबंधितांवर फसवणूक व एट्रोसिटी ऐक्ट नुसार कठोर कारवाई व्हायला पाहिजे.
जाहीर निषेध व्यक्त करतांना मा. किरणभाऊ गुडधे,विशाल बनसोडे, सनी गोंडाने, रुपेश कुत्तरमरे, सुनिता रायबोले, सारिका गवई, शीतल गजभिये, वर्षा वाकोडे, सतीश मेश्राम, प्रमोद राऊत, सिद्दार्थ दामोधरे, आनंद इंगळे, संजय निरगुळे, श्रीधर खडसे, प्रा.शैलेश गवई, दिनेश गजभिये, शेखर तायडे, सुनील मेटांगे, मंगेश कनेरकर, विजय वानखडे,साहेबराव नाईक, कपिल नाईक, गोपाल ढेकेकर, धम्मपाल पिलावन आदी अनेक समाजबांधव उपस्थित होते.