पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

0
16

खल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
:-पेट्रोल, डिझेल गॅसची दिवसेंदिवस होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ दर्यापूर तालुका काँग्रेस, सेवादल, युवक काँग्रेस यांच्या वतीने दि 7 जुनला खल्लार(बेंबळा)येथील पेट्रोल पंपासमोर निषेध आंदोलन करण्यात आले
हे आंदोलन दर्यापूर तालुका काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष नाना धाबे यांच्या नेतृत्वात करण्यात आले या आंदोलनात अरुण डिके, आशिष खराडे, नासीर शहा, मनिष मोपारी, नंदू हरणे, श्रीकृष्ण हरणे, निलेश सगणे, श्याम थोरात, आशिष मेश्राम, नितीन सगणे, जगदीश सगणे, बाळासाहेब दाभाडे, प्रविण मोपारी, शेख सलीम, जमिल शहा, रवि धाबे, उमेश मोहोड, संजू डिके, भास्कर तायडे, निलेश लांडे, हंगोले, विकास मेश्राम, विलास खंडारे, बाळासाहेब वानखडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते