१० व ११ जून जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता जिल्ह्यात कर्फ्यू कोणत्या 31 गावांना सावधानतेचा इशारा; पूराचा आणि दरडींचा धोका?

0
174

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता,१० व ११ जून या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात येणार हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या नुसार जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून जिल्ह्यात २०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे १० व ११ जून या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यु लावण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पत्रकारपरिषदेत दिली. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ९ जून ते ११ जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १० व ११ जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ११ जूननंतर देखील पावसाचा धोका कायम असेल असे जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले. या कालावधीत जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगर पालिकाआणि ३१ गावे धोकादायक व पुरबधित आहेत.याठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच या भागातील नागरिक व ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात दहा व अकरा तारखेला ढगफुटीसारखा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. जिल्ह्यात नद्यांना पूर येऊन तिरावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. पूररेषेखाली येणाऱ्या ३१ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे; तर ४५ ठिकाणे धोकादायक असून, तेथे दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे गरजेनुसार स्थलांतर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पूररेषेखाली येणाऱ्या ३१ गावांमध्ये प्रशासनानकडून संबंधित नागरिकांना आगाऊ इशारा दिला आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये ३१ गावे पूररेषेखाली आली आहेत. राजापूर तालुक्यातील राजापूर बाजारपेठ, काजिर्डा, डोंगर, पांगरी खुर्द, भाबलेवाडी ही पाच गावे, संगमेश्वर तालुक्यात साखरपा, कसबा, कुरधुंडा, नावडी, माभळे, वाशीतर्फे संगमेश्वर, कोळंबे, भडकंबा, पांगरी अशी नऊ, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वर, हरचेरी, चांदेराई, टेंभ्ये ही चार, चिपळूण तालुक्यात पेठमाप, गोवळकोट, मजरेकाशी, खेर्डी, चिपळूण शहर ही पाच, खेडमध्ये खेड शहर, प्रभुवाडी, चिंचखरी, सुसेरी, असलुरे ही पाच, गुहागर तालुक्यात वडद, पालशेत, परचुरी ही तीन गावे यांचा समावेश आहे.

*दखल न्यूज भारत*