महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर विजबिलांची होळी कार्यकारी उपविभागीय अभियंता यांना भाजपतर्फे निवेदन

 

प्रतिनिधी बिंबिसार शहारे
दखल न्युज भारत

गोंदिया दि.०१/०८/२०२०:
आज महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राज्यभर महाएल्गार आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरील दूध संकलन केंद्र बंद पाडून गोंदिया जिल्हा भाजपच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, शेतकऱ्याच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३० रुपये करावा अशी मागणी आंदोलन दरम्यान केली. तसेच कोरोना चा काळात वीज बिल भरमसाठ वाढल्याने सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे वीज बील माफ करण्यात यावे. प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळेस राज्य सरकार विरोधात नारेबाजी करत राज्य सरकारने मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मा.खोमेशजी रहांगडाले , मा.अशोकजी लंजे तालुका अध्यक्ष भाजपा , मा. शिशिर येळे ,मा.विलास बागडकर युवामोर्चा अध्यक्ष,मा.पदमाताई परतेकी,मा.माधुरी ताई पाथोडे, कवीताताई रंगारी,मा.हर्ष विनोदकुमार मोदी, गिरधारी हत्तीमारे सभापती पंचायत समिती,मा. राजेश कठाने उपसभापती सडक अर्जुनी मा. तुकाराम राणे, मा.गौरेश बावनकर ,मा.विजयजी बिसेन, मा.राजेश कापगते, मा.किशोर डोंगरवार,मा.प्रशांतझिंगरे,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.