वराडा येथील ५४% जळालेल्या महिलेचा मुत्यु.

0
37

 

कन्हान : – वराडा येथील महिला सौ संगिता उईके ही घरी स्वयंपाक करताना चुलीची आग साडीस लागुन जळाल्याने तिचा २२ दिवसानी उपचारा दरम्यान मेडीकल नागपुर ला मुत्यु झाल्याने कन्हान पोस्टे ला मर्ग दाखल करण्यात आला.
बुधवार (दि.१२) मे ला रात्री ९.३० वाजता वराडा येथील सौ संगिता आशिष उईके वय २७ वर्ष ही घरी चुलीवर स्वयंपाक करित असताना अचानक साडीचा पदर चुलीवर पडुन आग लागुन तिचे कपडे व ती ५४% जळाल्याने प्रथम ग्रामिण रूग्णालय रामटेक ला उपचा र करून नंतर मेडीकल कॉलेज नागपुर ला उपचारा दरम्यान गुरूवार (दि.३) जुन ला सायंकाळी ४ वाजता म्हणजे २२ व्या दिवसी तिचा मुत्यु झाला. सदर प्रकर णी सरकार तर्फे पोहवा राजेश माकडे मेडीकल बुथ नागपुर यांची तक्रार पोलीस स्टेशन कन्हान ला प्राप्त झाल्याने कलम १७४ जाफौ कायद्यान्वये मर्ग दाखल करून पोस्टे चे सपोनि सतिश मेश्राम पुढील तपास करित आहे.