रत्नागिरी प्रभाग क्र.६ रस्ते आणि पाणि प्रश्नांवर भाजप ने वेधले लक्ष.

0
117

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक सहा नाचणे रोड रत्नागिरी या परिसरातील अनेक भागात नळपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महीना भरात आपण प्रभागातील नळपाणी योजनेला प्रारंभ करणार तसे प्रत्यक्ष भेटीत भाजप पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनावर सांगितले होते मात्र अजूनही अनेक भागात नवीन नळ पाणी योजनेतून नळजोडणी बाकी असल्याचे दिसते तर प्रभागातील काही भागातील पाणी प्रश्न बिकट आहे. अभुद्यनगर, विश्व नगर, नूतन नगर, चैत्रबन, राजेंद्र नगर, आनंद नगर परिसरातील नागरिकांच्या पाण्याविषयक समस्या सह्यांची मोहीम घेत आम्ही आपणास निवेदनातून याआधी दिले आहेत, तरी या बाबत आपण गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर नळपाणी योजनेचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच नळपाणी योजनेसाठी पाडण्यात आलेले खड्डे बुजवावेत व प्रभागातील खराब झालेले रस्ते ज्यामुळे नागरिकांना फार त्रास होत आहे.रस्ते पावसापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना तसे झालेले अद्याप दिसत नाही तरी रस्त्यांवरील खड्डे भरून तेथील रहिवाशांना दिलासा द्यावा अशी विनंती पुन्हा एकदा या निवेदनातून भारतीय जनता पक्षाचे निलेश आखाडे,प्राजक्ता रुमडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्याधिकारी रत्नागिरी यांस दिलेल्या निवेदनात केली आले.

*दखल न्यूज भारत*